वाई : वाई-आकोशी रस्त्यावर बोरगाव (ता. वाई) हद्दीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एसटी बस व वाळूच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकचालकासह ३२ जण जखमी झाले. त्यामध्ये २४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, वाई आगारातील वाई-आकोशी एसटी बस (एमएच ११-टी ९२७७) सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाईला परतत होती. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत होते. दरम्यान, वाईहून बोरगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या भरधाव ट्रकने (एमएच-११ सीएच २६११) बोरगाव (ता. वाई) येथे समोरासमोर जोरदार धडक झाली.यात ट्रकचालक निहाल श्रीरंग जाधव (वय २२, रा. दरेवाडी, बावधन, ता. कोरेगाव), चैतन्य संतोष जाधव (१५), श्रृती संतोष जाधव (१३, दोघे रा. परतवडी), संकेत सुनील गायकवाड (१४), शुभम सदानंद गायकवाड (१५), मधुमिता विकास निगडे (१५, तिघे रा. नादंगणे), ओंकार शंकर वाडकर (१५), रोहित चंद्रकांत वाडीकर (१५), साधना संजय वाडकर (१५), रुपेश बाळू वाडकर (२३), ऋतुजा भाऊ जंगम (१७), अश्विनी महादेव पंडित (२१), तुकाराम दगडू वाडकर (६२), आनंदा दगडू वाडकर (६०), रवींद्र तुकाराम वाडकर (६५), बाळू हरिभाऊ वाडकर (४६), पूजा शिवाजी वाडकर (१८ सर्व रा. वयगाव), करण मारुती जाधव (१५, बलकवडी), अक्षदा राजेंद्र धनावडे (१५), दर्शना संजय धनावडे (१४), अमिशा संतोष धनावडे (१५), निकिता नारायण धनावडे (१६), साक्षी आनंद धनावडे (१५, रा. दहयाट), सविता मारुती औकीरकर (१५), कविता आनंद कात्रट (१५, रा. गोळेगाव), संदेश गणपत चोरट (१९), सोनाली संजय शिंगटे (१९), राजाराम काशिनाथ बेलोशे (४२), अजित जानू चोरट (३६), जानू दगडू चोरट (६२), जनाबाई विठ्ठल चोरट (८०), आदित्य कृष्णदेव चोरट (१४, रा. कोंढवली), बबन दगडू कदम (६५ रा. गोळेवाडी), गणपत मारुती भणगे (७०), श्रीपती कोंडिबा भणगे (७०), गंगुबाई शंकर शिंदे (५७), संतोष राजाराम शिंदे (३८), फुलाबाई देवराम जाधव (५८ रा़ आकोशी) जखमी झाले.अपघातील जखमींना तातडीने वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती समजताच तहसीलदार रमेश शेंडगे, वाई आगारप्रमुख जगदाळे, गटशिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम करीत आहेत.
बोरगावात एसटी-ट्रकच्या धडकेत ३२ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:58 PM