सातारा : मानधनाएेवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सेविका आणि मदतनीसांनी बुधवारी अंगणवाड्या बंद करुन मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे सातारा जिल्ह्यातील ३ हजार २९३ अंगणवाड्यांना टाळा लागला. तर ६ हजार १२५ सेविका आणि मदतनीस बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.मागील नऊ महिन्यांपूर्वी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी ५२ दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी आंदोलन मागे घेतले. पण, त्यानंतर शासनाकडून मागण्यांबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी पुन्हा मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी संघटनेनेही आंदोलन केले.साताऱ्यात पाच दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिक सेविका संघाच्यावतीने जेल भरोही झाले होते. त्यानंतर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून अंगणवाडी कर्मचारी कृती समितच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी २५ सप्टेंबरला मंबईतील आझाद मैदानात महाआंदोलन करण्यात येणार होते. यासाठी सातारा जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी झाल्या. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.सातारा जिल्ह्यात एकूण ४ हजार ५६२ अंगणवाड्या आहेत. त्यातील ३ हजार २९३ अंगणवाड्या बंद होत्या. माण, फलटण, जावळी महाबळेश्वर या तालुक्यात या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला.
जिल्ह्यातील अंगणवाड्या माहितीतालुका - बंदमध्ये अंगणवाड्या - सेविकांचा सहभाग - मदतनीसांचा सहभागपाटण - ५९१ - ५५३ - ३३३कऱ्हाड - २२३ - २४७ - २२८सातारा - ३०३ - ४३० - ३९१जावळी - २७६ - २६९ - २०७महाबळेश्वर - १४३ - १२१ - ९९वाई - ०० - ०० - ००खंडाळा - १८१ - १८० - १६४फलटण - ४७३ - ४६० - ४३२माण - ३९८ - ३९० - ३४२खटाव - ४३२ - ४३९ - ३५५कोरगाव - २५२ - २४७ - २३२