शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

किल्ले प्रतापगडावर पेटल्या ३६४ मशाली! मशाल महोत्सव दिमाखात

By सचिन काकडे | Published: October 20, 2023 9:54 PM

हजारो शिवभक्तांची गडावर हजेरी

महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्री ३६४ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी, ढाेल-ताशाचा गजर अन‌् जय भवानी.. जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटवून मशाल महोत्सव सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रोत्सवात मशाल महोत्सव साजरा केला जात असून, यंदा या महोत्सवाचे चौदावे वर्षे आहे. शुक्रवारी रात्री भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर साडेआठ वाजता  पारंपरिक वाद्याचा गजर व जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषांत मशाली प्रज्वलीत करण्यात आल्या. भवानी माता मंदिरापासून किल्ल्याच्या बुरुजापर्यंत पेटविण्यात आलेल्या माशालींनी गड व परिसर उजळून निघाला. हा देदिप्यमान सोहळा हजारो शिवभक्तांनी आपल्या डोळ्यात सामावून घेतला. किल्ल्याच्या चहुबाजूनी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे किल्ल्याचे सौंदर्य उजळून निघाले. गडावर आलेल्या भाविकभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

किल्यावर दोन घट...किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट छञपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारण  शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने, कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचबरोबरच गेल्या चौदा वर्षांपासून गडावर मशाल महोत्सवही साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे आयोजन हस्तकलाकेंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर,संतोष जाधव, अभय हवलदार स्वराज्य ढोल पथक, माय भवानी सामाजिक संस्था प्रतापगड, वाडा कुंभरोशी ग्रामस्थ करीत असतात.

टॅग्स :Pratapgad Fortप्रतापगड किल्ला