शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

एका दिवसात ४० किलोमीटरचा तयार झाला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:29 AM

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात ...

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. यामध्ये २५.५४ कि. मी. रस्ता हा अवघ्या १४ तासात पूर्ण करून विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. हे काम ३ शिफ्टमध्ये एकाच वेळी ६ ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत ६० अभियंते, ४७ पर्यवेक्षक, २३ गुणवत्ता नियंत्रक अभियंते, १५० वाहनचालक, ११० मजूर असे एकूण ३९० कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून याचे नियोजन सुरू होतेे. अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सूक्ष्म नियोजन करून ते तडीस नेण्यासाठी सतत कार्यरत होते. गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी ८ मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, ७ मॉर्डन सेन्सर पेव्हर, १२ व्हायब्रेटरी रोल, ६ न्युमॅटीक रोलर १८० डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला. १,१०० मे. टन डांबर व ६,००० घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.

या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरून कौतुक केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

कोट

उत्कृष्ट नियोजन भव्य स्वप्न त्यासाठी गुणनियंत्रण पद्धती वापरून काम पूर्ण करण्याचा मानस, प्रयत्न व त्यात यशस्वी झाले. सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो.

सदाशिव साळुंखे

मुख्य अभियंता

चौकट

असा झाला विक्रम

या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले.

३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.

प्रत्येक भागातील काम करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती.

या कामासाठी एकूण ११,००० मेट्रिक टन बिटुमन काँक्रिट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते.

काँक्रिटचे हे मटेरिअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पीटीआर वापरण्यात आले.

या मटेरिअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले.

प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्वाॅलिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते.

एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पूर्ण कामासाठी तैनात होते.

यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.