लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक असणाºया झेंडूच्या फुलांच्या दराने यंदा भलताच चढ उतार अनुभवला. सकाळी ८० रुपये किलोवर असलेला झेंडू दुपारी ४० रुपयांवर गडगडला. त्यानंतर सायंकाळच्या टप्प्यात दराने अडीचशे रुपयांची उसळी मारली. रात्री आठनंतर हा दर अक्षरश: तीस रुपयांपर्यंत कोसळला.लक्ष्मी पूजनासाठी सातारकरांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांच्या खरेदीस पसंती दिली. सातारा तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी झेंडूची फुले विक्रीसाठी घेऊन आले होते. शहरातील पोवई नाका राजवाडा या मुख्य ठिकाणांबरोबरच शहरात विविध गल्लीत गाडी लावून फुलांची विक्री सुरू होती.झेंडूच्या फुलांबरोबरच शेवंतीची फुले खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल होता.दसरा आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक शेतकºयांनी आंतरपीक म्हणून झेंडूला पसंती दिली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे दसºया दरम्यान झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर अवघ्या दीड आठवड्यात दिवाळी आल्याने शेतकºयांनी पाऊस पडू नये म्हणून साकडे घातलेहोते. पावसाने उघडीप दिल्याने दसºयाचे नुकसान भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळाली.त्या संधीचे शेतकºयांनीही सोनेकेले. त्यामुळे कधी नव्हे इतक्या उच्चांकी दराने फुलांची विक्रीझाली.
सकाळी ४० तर संध्याकाळी २५० रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:45 PM