लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इतिहासामध्ये प्रथमच 7 देशातील ४,३०० आमदार राष्ट्रीय न विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर चर्चा करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित 'राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत' मुंबई येथील बीकेसी जिओ सेंटरमध्ये १५ ते १७ जून या काळात होत आहे, अशी माहिती विधान परिषद माजी र अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, एमआयटी माध्यम समन्वयक योगेश पाटील यांनी दिली.
भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील- चाकुरकर, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत' ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.
रामराजे पुढे म्हणाले, राज्यातील सर्वांगीण शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा सर्व पक्षांतील आमदारांनी संमेलनात उद्देश ठेवून आयोजित केलेल्या या सहभागी होऊन लोकशाहीला अधिक संमेलनाचे उद्घाटन १५ जून रोजी सशक्त करण्यासाठी योगदान द्यावे. होणार आहे. १७ जून रोजी या राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व संमेलनाचा समारोप होईल.