सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषतः राज्य सरकारने केलेल्या संचारबंदीनंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हायला हवी होती; परंतु त्या उलट चित्र पाहायला मिळत असून, संचारबंदीच्या काळामध्ये जिल्ह्यात ४८ हजार ५५७ इतके कोरोनाबाधित सापडलेले आहेत.
१५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना टेस्टिंगचे प्रमाणदेखील प्रशासनातर्फे वाढविण्यात आले आहे. जे लोक बाधित आढळले त्यांच्या संपर्कातील लोकांना संसर्ग झालाय का याचीदेखील माहिती घेण्यात आली. जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला.
कोरोनाबाधितांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यातूनच बाधितांची संख्यादेखील वाढल्याचे चित्र आहे. टेस्टिंग वाढल्याने संसर्ग झालेली व्यक्ती लवकरात लवकर समजून येते आणि समूह संसर्ग रोखला जाऊ शकतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत रोज २००० च्यावर बाधित आढळत आहेत. तसेच गेले काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे.
मुद्दे
१) पॉईंटर्स
अ) ३१ मार्च ते १४ एप्रिल
टेस्टिंग - ७४०००
पॉझिटिव्ह -१८३७२
रुग्णालयातून सुटी - १६७७८
पॉझिटिव्हिटी रेट - २१.५०
कोरोनामुक्तीचा दर - ९० %
ब) १५ एप्रिल ते १ मे
टेस्टिंग - ७७८८२
पॉझिटिव्ह - ३०१८५
रुग्णालयातून सुटी -१८८९८
पॉझिटिव्हिटी रेट -३४.१६%
कोरोनामुक्तीचा दर -८५%
२) या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
अ पहिल्याला त्यानंतर लोक निर्धास्त झाले
ब बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली
क सण उत्सव समारंभ पूर्वीसारखे साजरे झाले
३) शहरातच वाढले प्रमाण
जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड या मोठ्या शहरांमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढलेली आहे. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून लोक कामानिमित्त येत असतात. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या शहरांमध्ये उडालेला होता. कऱ्हाड हे शहरदेखील बाजारपेठेचे शहर असल्याने कोकण तसेच विटा, मायणी, इस्लामपूर या परिसरातून खरेदीसाठी लोक या शहरात येतात. गर्दी वाढल्याने या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट झाला.
४) चाचणीसाठी लागलेल्या रांगेचा फोटो (तीन कॉलम)