सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि शिरताव हद्दीत गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात काहीजणांनी कार आणि जेसीबी नेऊन ‘तुम्ही तालुक्यात काम कसे करता,’ असे म्हणत तेथील इन्व्हर्टर रूम, सिमेंट काँक्रीट केलेल्या कॉलमचे जेसीबीच्या साह्याने नुकसान केले. तसेच कंपनीकडून खंडणी म्हणून काही रक्कम मागण्यात येऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात खंडणी मागणे, कंपनीचे नुकसान केल्यामुळे विशाल दिलीप पट्टेबहादूर (वय २७, मूळ रा. नाशिक, सध्या रा. दहिवडी) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाडी, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय २३, रा. म्हसवड, ता. माण), विलास बाबूराव पाटोळे (३६) सतीश आनंदा धडांबे (३६) व सागर शंकर जाधव (३०, तिघेही रा. महिमानगड, ता. माण) यांच्यासह इतर १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.गोरेंचा जामीन फेटाळला होतागिरिराज रिन्यूएबल कंपनीचे बांधकाम उकरून टाकून खंडणी मागितल्याप्रकरणात शेखर गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळून लावला होता.गेल्या आठवड्यात वडूज न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.१ टोळीच्या माध्यमातून खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिकफायदा करून घेणाºयांना आळा बसण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाºयांना केली होती.२ म्हसवड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी यावर लक्ष ठेवले होते.३ त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
शेखर गोरेंसह ५ जणांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:29 PM