सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, गुरुवारी रात्री नवे ५० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ५५ हजार ५२ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधून-मधून सुरूच असून, बुधवारी दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे बळींची संख्या १ हजार ७९७ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्री ५६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र आटोक्यात आले आहे. परंतु अधून-मधून एक दोघांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, गुरुवारी दिवसभरात २२ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ४७६ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच गुरुवारी २६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.