शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

५० व्या वर्षी गुन्हा.. ..७५ व्या वर्षी शिक्षा ! : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:09 AM

मुंबई/सातारा : भेसळयुक्त तेलाची विक्री केल्याप्रकरणी साताºयातील किराणा भुसार व्यापारी हरिश्चंद्र साधुराम अग्रवाल यांना

ठळक मुद्देभेसळयुक्त तेल विकणं साताºयाच्या व्यापाऱ्याला अंगलट

मुंबई/सातारा : भेसळयुक्त तेलाची विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील किराणा भुसार व्यापारी हरिश्चंद्र साधुराम अग्रवाल यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. अशा प्रकारे वयाच्या ५० व्या वर्षी केलेल्या गुन्ह्याबद्दल अग्रवाल यांना आता वयाच्या ७५ व्या वर्षी शिक्षा भोगावी लागणार आहे. भेसळप्रकरणात ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा आहे.

याबाबत माहिती अशी की, साधुराम अग्रवाल हे साताऱ्यातील यादोगापाळ पेठेतील त्याच नावाच्या किराणा भुसार दुकानाचे मालक आहेत. उच्च न्यायालयाने अन्न भेसळीच्या एकूण तीन गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरविले आहे. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. शिक्षा भोगण्यासाठी त्यांनी चार आठवड्यात साताºयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर व्हायचे आहे. याखेरीज अग्रवाल यांना प्रत्येक गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंडही झाला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) साताऱ्यामधील त्यावेळचे एक अन्न निरीक्षक के. ए. शिंत्रे यांनी २३ सप्टेंबर, १९९३ रोजी अग्रवाल यांच्या दुकानाची तपासणी केली होती. त्यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येकी १५ किलोच्या सीलबंद डब्यांमधून त्यांनी एकूण ४५० ग्रॅम खाद्यतेल तपासणीसाठी विकत घेतले होते.त्या नमुन्यांची पुणे येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते खाद्यतेल भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाले होते.

‘एफडीए’चे तत्कालीन सहआयुक्त यू. आर. गोटखिंडीकर यांनी परवानगी दिल्यानंतर अग्रवाल यांच्यावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये तीन खटले दाखल केले गेले. साताऱ्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाºयांनी नोव्हेंबर १९९६ मध्ये तिन्ही खटल्यांमध्ये अग्रवाल यांना दोषी ठरविले आणि प्रत्येक खटल्यात सहा महिने कैद व दोन हजार रुपये दंड अशा शिक्षा दिल्या.

याविरुद्ध अग्रवाल यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली असता तेथे त्यांच्याबाजूने निकाल झाला व दंडाधिकाºयांचा निकाल रद्द केला गेला. त्यावर ‘एफडीए’ने १९९९ मध्ये केलेली अपिले न्या. भारतीडांगरे यांनी दंडाधिकाºयांच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. ‘एफडीए’साठी सहायक सरकारी वकील जे. पी. याज्ञिक यांनी तर दोषी व्यापाऱ्यासाठी अ‍ॅड. के. पी. शहा यांनी काम पाहिले.संमती व परवानगीमध्ये फरकअन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकाºयाने परवानगी देणे आवश्यक असते. यासाठी कायद्यात ‘सँक्शन’ असा इंग्रजी शब्द न वापरता ‘कन्सेंट’ असा शब्द वापरला आहे. सहआयुक्त गोटखिंडीकर यांनी सखोल विचार न करता परवानगी दिली होती, असा निष्कर्ष काढून सत्र न्यायालयाने अग्रवाल यांना निर्दोष ठरविले होते.

उच्च न्यायालयाने ‘सँक्शन’ व ‘कन्सेंट’ या दोन शब्दांमधील फरक सविस्तरपणे तपासला व परवानगीसाठी संमतीच्या तुलनेत सक्षम प्राधिकाºयाने कमी चिकित्सा करणे अपेक्षित आहे, असे म्हटले. शिवाय साक्षीपुराव्यांच्या आधारेही अग्रवाल यांच्यावरील गुन्हे सिद्ध होत असल्याचे नमूद केले.