शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

साताऱ्यात लवकरच हेल्मेट सक्ती होणार, वर्षभरात अपघातात गेले 'इतके' जीव

By दीपक शिंदे | Published: March 11, 2024 3:25 PM

बळींची संख्या रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी होणार

सातारा: जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून, कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.जिल्ह्यात रोज अनेक ठिकाणी भीषण अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे, धोकादायक वळण, ब्लॅकस्पाॅट हटविण्यात आले तरी सुद्धा मृत्यूचा आकडा का वाढत आहे. यावर जिल्हा पोलिस दलाने आढावा घेतला. त्यावेळी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे समोर आले. परिवहन आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले असताना अनेकजण हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का, याची पडताळणी करते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच विम्यासाठी क्लेम करणे देखील सोयीचे होते. या सर्व बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सुरूवातीला वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

वर्षेभरात अपघातात ५०१ जणांचा मृत्यूजिल्ह्यात २०२३ मध्ये अपघातात तब्बल ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ खुनाचे प्रकार घडले असून, ४८ जणांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे सर्वाधिक बळी हे अपघातातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातात जाणारे नाहक जीव वाचविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आता पोलिसही नोंद घेणारअपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराने हेल्मेट अथवा कार चालकाने सीट बेल्ट लावला होता का, हे पोलिस आता त्यांच्या खबरी अहवालामध्ये नोंद करणार आहेत. पूर्वी अशाप्रकारची नोंद केली जात नव्हती. त्यामुळे अपघातातील मृत व्यक्तीचे कारण समोर येत नव्हते.

वाहन चालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सजग असायला हवे. वर्षभरात सीटबेल्ट आणि हेल्मेट न घातल्याने बऱ्याच लाेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे सुरूवातीला वाहन चालकांमध्ये जनजागृती करून नंतर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. - समीर शेख-पोलिस अधीक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिस