कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ५१ अंगणवाड्या ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाल्या आहेत. पंचायत समिती कऱ्हाडच्या वतीने यावेळी अंगणवाड्यांना येथील यशवंतराव चव्हाण बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, महिला बालकल्याण सभापती कल्पना मोरे, सभापती देवराज पाटील, सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, पंचायत समिती सदस्या रूपाली यादव आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बालविकास प्रकल्पाधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.अध्यक्ष सोनवलकर म्हणाले, ‘जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाड्यांचे काम कऱ्हाड तालुक्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर्वाधिक शाळा आणि अंगणवाड्या कऱ्हाड तालुक्यात आयएसओ झाल्या आहेत. त्यातून हे दिसून येते. उर्वरित शाळा, अंगणवाड्याही चांगल्या पद्धतीने कामकाज करून आयएसओ कराव्यात.आमदार आनंदराव पाटील, सभापती देवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अधिकारी लोंढे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कऱ्हाड तालुक्यातील ५१ अंगणवाड्या आयएसओ!
By admin | Published: February 07, 2016 10:06 PM