सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या २,०८२ उमेदवार अर्जांपैकी ६० उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये गटाचे ४२ तर गणातील १८ अर्ज अवैध ठरले. जातपडताळणी प्रमाणपत्राची पोच सादर न करणे, शौचालयाचा दाखला, ठराव नसणे तसेच अर्जावर सही नाही, शपथपत्रावर सही नाही, अशा मुख्य कारणांसाठी हे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. सातारा तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या २८८ उमेदवारांपैकी ८ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. सातारा तालुक्यात आता जिल्हा परिषदेसाठी ८० उमेदवार तर पंचायत समितीसाठी १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. जावळी तालुक्यात पंचायत समितीच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज बाद ठरला. कऱ्हाड तालुक्यातील पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, सैदापूर, वारुंजी, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले, येळगाव या बारा गटांतून १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पंचायत समितीच्या चोवीस गणातून २८५ अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँगे्रसमधून कार्वे गणातून रूपाली मारुती मुळे यांनी दाखल केलेला अर्ज अनामत रक्कम न भरल्याने तसेच जात प्रमाणपत्र व जातपडताळणी सादर न केल्यामुळे यांचा निवडणूक निर्णय अधिकारी किसातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या २,०८२ उमेदवार अर्जांपैकी ६० उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये गटाचे ४२ तर गणातील १८ अर्ज अवैध ठरले. जातपडताळणी प्रमाणपत्राची पोच सादर न करणे, शौचालयाचा दाखला, ठराव नसणे तसेच अर्जावर सही नाही, शपथपत्रावर सही नाही, अशा मुख्य कारणांसाठी हे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. सातारा तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या २८८ उमेदवारांपैकी ८ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. सातारा तालुक्यात आता जिल्हा परिषदेसाठी ८० उमेदवार तर पंचायत समितीसाठी १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. जावळी तालुक्यात पंचायत समितीच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज बाद ठरला. कऱ्हाड तालुक्यातील पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, सैदापूर, वारुंजी, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले, येळगाव या बारा गटांतून १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पंचायत समितीच्या चोवीस गणातून २८५ अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँगे्रसमधून कार्वे गणातून रूपाली मारुती मुळे यांनी दाखल केलेला अर्ज अनामत रक्कम न भरल्याने तसेच जात प्रमाणपत्र व जातपडताळणी सादर न केल्यामुळे यांचा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर पवार यांनी अवैध ठरविला.पाटण तालुक्यात पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १४६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ अर्ज छाननीत बाद झाले तर जिल्हा परिषद गटाच्या ७ गटांसाठी ८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले. महाबळेश्वरात छाननीमध्ये तळदेव गणातील शिवसेनेच्या उमेदवार भागाबाई संजय शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज बाद झाला. आता दोन गटात १० तर चार गणात १५ असे एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुदाम गुलाबराव लोखंडे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला आहे. माण तालुक्यात एकूण १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवारी झालेल्या छाननीत एकूण २६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. वाई तालुक्यात १९ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे नऊ अर्ज तर पंचायत समितीचे १० अर्ज अंतिम छाननीत बाद झाले़ फलटणमध्ये पंचायत समितीच्या एका उमेदवाराचा अर्ज (पान १२ वर)शोर पवार यांनी अवैध ठरविला.पाटण तालुक्यात पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १४६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ अर्ज छाननीत बाद झाले तर जिल्हा परिषद गटाच्या ७ गटांसाठी ८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले. महाबळेश्वरात छाननीमध्ये तळदेव गणातील शिवसेनेच्या उमेदवार भागाबाई संजय शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज बाद झाला. आता दोन गटात १० तर चार गणात १५ असे एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुदाम गुलाबराव लोखंडे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला आहे. माण तालुक्यात एकूण १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवारी झालेल्या छाननीत एकूण २६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. वाई तालुक्यात १९ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे नऊ अर्ज तर पंचायत समितीचे १० अर्ज अंतिम छाननीत बाद झाले़ फलटणमध्ये पंचायत समितीच्या एका उमेदवाराचा अर्ज मंगळवारी बाद ठरवण्यात आला. खटावमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर पंचायत समितीच्या सिद्धेश्वर कुरोली गणाच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार संगीता चंद्रकांत मोरकाने यांचा अर्ज जातपडताळणीची पावती नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवेंनी अवैध ठरवला.
६० अर्ज अवैध
By admin | Published: February 07, 2017 11:01 PM