सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांत हळू-हळू वाढ होतच असून मंगळवारी रात्री नवीन ६० बाधित वाढले. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५७ हजार १११ वर पोहोचला, तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १०५ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५४ हजार ४५४ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केल्यानुसार ६४ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातीलही काही गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत. कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील वाघेरी येथे कोरोना रुग्ण आढळला. त्याचबरोबर माण, खटाव, पाटण, कोरेगाव या तालुक्यांतही नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील एका ८० वर्षांच्या वृध्देचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १ हजार ८३१ वर पोहोचली आहे.
चौकट :
३३९ जणांचे नमुने तपासणीला...
दिवसभरात कोरोनाच्या संशयावरून ३३९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील २५, कऱ्हाड २०, कोरेगाव येथील १०, वाई ४१, खंडाळा १, रायगाव येथील ३६, पानमळेवाडी येथील १०७, महाबळेश्वर १०, दहीवडी २४, म्हसवड येथील १५, पिंपोडे येथील ६ आणि कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ४४ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
.......................................................