सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एप्रिल महिन्यातील पहिल्या १० दिवसांत तब्बल २६ हजार संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ हजार २९५ रुग्ण बाधित आढळले. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकट सुरू झाले आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या हळू हळू वाढू लागली. तर जून महिन्याच्या उत्तरार्धापासून शेकडोच्या पटीत बाधित आढळू लागले. यानंतरच जिल्ह्यात खºयाअर्थाने कोरोना कहर सुरू झाला. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाचा कहर मोठा होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही कोरोना बाधित सापडू लागले. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३८ हजारांवर गेला होता. तसेच मृत्यमुखी पडणाºयांचीही संख्या वाढली. असे असलेतरी आॅक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.
नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. आॅक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असलेतरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते. जानेवारीपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारी सुरू होताच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. तर कोरोनामुक्त कमी झाले. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.
मार्चमध्ये कोरोनाचे ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. १५ ने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली. तर १ हजार २२३ जण कोरोना मुक्त झाले. असे असलेतरी एप्रिलमधील पहिल्या १० दिवसांत तब्बल ६ हजार २९५ रुग्ण वाढले. तर जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजारांवर बाधित सापडले आहेत. मृतांचा आकडा १ हजार ९६४ वर पोहोचला असून यामधील ५४ बळी हे या दिवसांतील आहेत. त्याचबरोबर एप्रिलमध्ये १० तारखेपर्यंत २६ हजारांहून अधिक संशयितांची कोरोना चाचणी झाली आहे. ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक ठरत आहे.
चौकट :
कोरोनामुक्तांचा आकडा ६३ हजारांवर...
जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृत्यमुखी पडणाºयांचाही आकडाही सतत वाढत आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाºयांची संख्या कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६३ हजार ३३५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामधील २ हजार ९७४ जण हे एप्रिलमध्ये बरे झाले आहेत.
...............