सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतच असून, मंगळवारी नवीन ६३ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ५५ हजार ३२८ वर पोहोचला, तर कोरोनामुक्त ठरलेल्या १४५ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५२ हजार ७५९ नागरिक बरे झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केल्यानुसार ३४ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील काही गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच कºहाड, पाटण, खटाव, फलटण, माण, कोरेगाव, जावळी, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झालेली आहे. तर आतापर्यंत १ हजार ८०३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मंगळवारी २७२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून १८, कºहाड २७, फलटण १५, कोरेगाव येथील १४, वाई २६, रायगाव ४, खंडाळा १२, पानमळेवाडी ७४, महाबळेश्वर ७, दहिवडी ११, म्हसवड येथील ४, पिंपोडे ८ व कºहाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून ५२ अशा २७२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
..............................................................