शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

कोयनेत ६३ टीएसमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:41 AM

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ ...

कोयनानगर : कोयना धरणातील कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर धरणात ६३ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. हे पाणी वीज निर्मिती व सिंचनासाठी पुरेसे आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेले कोयना धरण आहे. याच धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष असते.

कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. यातील पाण्यापासून सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी तर उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार हजेरी लावली.

धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने धरण भरून वाहत होते. कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ३१ मार्चला दहा महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला आहे. ६७.५० टीएमसीपैकी ४६.९५ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. तब्बल २१.९५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी शिल्लक आहे.

पूर्वे व पश्चिमेला पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्षातील दहा महिने संपले आहे. तांत्रिक वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक असताना ३१ मार्चअखेर कोयना धरणात ६३.०० टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाई व भारनियमनाची चिंता मिटली आहे.

बुधवार, दि. ३१ मार्चअखेर धरणातून वीज निर्मितीसाठी पश्चिमेला ४६.९५ टीएमसी व पूर्वेला पायथा वीजगृहातून पूरजन्य स्थिती व सिंचनासाठी सोडलेल्या २६ टीएमसी पाण्याचा वापर करत कोयना जलविद्युत प्रकल्पातून २ हजार २६६.०६७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. आजवर ६.९४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

चौकट

पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग

सध्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचनासह कोयना, कृष्णा नदी शेजारील गावांना पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजमितीस धरणातील शिल्लक पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा आहे. मात्र, मे महिन्यातील वाढीव मागणी व मान्सूनची वेळेत सुरुवात महत्त्वाची आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके यांनी दिली.

दहा वर्षांत ३१ मार्चअखेर कोयना धरणातील शिल्लक पाणीसाठा

२११० : ७२.५९

२०११ : ६३.४४

२०१२ : ५७.३५

२०१३ : ५७.०५

२०१४ : ४२.४२

२०१५ : ६६.९०

२०१६ : ३८.७४

२०१७ : ४२.८८

२०१८ : ६६.०२

२०१९ : ६३.२२

२०२० : ६६.८३

२०२१ : ६५.००