या विविध कामांचा शुभारंभ युवानेते इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते नुकताच पार पडला. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, सरपंच प्रेमिला कुंभार, धनाजी पाटील, सुरेश पाटील, वसंतराव सावंत, जालिंदर देशमुख, रमेश पाटील, सुनील चवरे, धनाजी चवरे, महेश पाटील, हणमंत पाटील, जयवंत पाटील, सद्दाम मुल्ला, विजय पाटील, सागर विभूते, सदाशिव नांगरे, माजी सरपंच गणपत पोतदार, किरण चवरे, अशोक लोहार, उदय पाटील, दिलीप मोहिते, राहुल देशमुख, सचिन मोहिते, प्रसाद जाधव यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
साळशिरंबे गावास जलजीवन मिशनअंतर्गत नवीन विहीर व वितरण व्यवस्थेसाठी ३७ लाख रुपये, तर नळ पाणीपुरवठासाठी १० लाख रुपये, गावातील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रुपये, ओढ्यालगत संरक्षण भिंतीसाठी १० लाख रुपये असा एकूण ६७ लाख रुपयांचा भरघोस निधी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मिळाला आहे.
पैलवान तानाजी चवरे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाल्यापासून साळशिरंबे गावास भरघोस निधी मिळत आला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात. यामध्येच लोकप्रतिनिधी या नात्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी साळशिरंबे गावास कधीही निधी कमी पडू दिला नाही. यामुळेच गावात अनेक लोकोपयोगी विकासकामे पूर्णत्वास आली आहेत.
स्वागत उपसरपंच अभिजित चवरे यांनी केली व आभार महेश पाटील यांनी मानले.
फोटो
साळशिरंबे (ता. कऱ्हाड) येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी इंद्रजित चव्हाण, पैलवान तानाजी चवरे व मान्यवर.