भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गावरुन जाणारी टाटा सुमो गाडी बदेवाडी गावालगत असणार्या दोन पुलांमध्ये तब्बल पंचवीस फूट खोल कोसळली. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातात सात जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, हा अपघात इतका भयानक होता, की दैव बलवत्तर म्हणूनच सुमोतील सर्वजण बचावले. हा अपघात रिलायन्स कंपनीच्या चुकीच्या व अपुर्या बांधकामामुळेच झाला असून अपघाताबाबत रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती अशी, हेमंत नारायण भोसले, रा. चाहूर, ता. वाई हल्ली रा. नागठाणे, ता. सातारा हे आपली टाटा सुमोर क्र. एमएच ११ एल ९९९0 घेऊन सातारा बाजूकडून पुणेकडे निघाले होते. त्याच्यासह टाटा सुमोत सात जण होते. ही गाडी भुर्इंज पोलीस ठाण्यापासून पुढे गेल्यानंतर रात्री २ वाजता दोन्ही रस्त्यामध्ये असणार्या दुभाजकावर गेली आणि पुलाखाली कोसळली. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने जवळच असणार्या बदेवाडी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना मदत करुन गाडीबाहेर काढले. सुमो चालक हेमंत भोसले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर इतर सात जण किरकोळरित्या जखमी झाले. वेळेपासून सातारापर्यंत असणारे सर्वच पूल उत्तर व दक्षिण बाजूस संरक्षण कठडे नसल्याने धोकादायक बनले आहेत. महामार्ग प्राधिकरणाने यात गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असून संरक्षक कठडे न बांधल्यास मोठे अपघात होऊ शकतात. महामार्ग प्राधिकरणच्या गलथानपणामुळे शिरवळ येथील नीरा नदीत झालेल्या अपघाताप्रमाणेच एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहिली जात आहे. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सय्यद करीत आहेत. (वार्ताहर)
टाटा सुमो पुलावरुन कोसळून सात जखमी
By admin | Published: May 13, 2014 11:52 PM