फलटण : फलटण तालुक्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असताना दुसरीकडे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. आत्तापर्यंत ७० टक्केहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
फलटण तालुक्यात पूर्वी लसीकरणाचा वेग कमी होता. वरूनच लस कमी येत असल्याने लसीकरणासाठी जनता हैराण झाली होती. मात्र, आता लसी उपलब्ध होऊ लागल्याने आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. ७० टक्केहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
फलटण तालुक्यात १८ ते ४४ वयोगटांतील १ लाख ३४ हजार २७५ म्हणजे ४५ टक्के, ४५ ते ५९ वयोगटांतील ९९ हजार ६२९ म्हणजे ३५ टक्के आणि ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील ५८ हजार ६२३ म्हणजे २० टक्के असे एकूण २ लाख ९२ हजार ५२७ लाभार्थी आहेत.
१८ ते ४४ वयोगटातील १ लाख ३४ हजार २७५ लाभार्थ्यांपैकी ८० हजार ९६० म्हणजे ६०.२९ टक्के, ४५ ते ५९ वयोगटातील ९९ हजार ६२९ लाभार्थ्यांपैकी ६९ हजार ९६३ म्हणजे ७०.०९ टक्के आणि ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील ५८ हजार ६२३ लाभार्थ्यांपैकी ५३ हजार ८८२ म्हणजे ९१.९१ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
१८ ते ४४ वयोगटातील १ लाख ३४ हजार २७५ लाभार्थ्यांपैकी ६९ हजार ०३८ लाभार्थ्यांचा पहिला आणि ११ हजार ९२२ लाभार्थ्यांचा दुसरा, ४५ ते ५९ वयोगटातील ९९ हजार ६२९ लाभार्थ्यांपैकी ४७ हजार ०७७ लाभार्थ्यांचा पहिला आणि २२ हजार ८८६ लाभार्थ्यांचा दुसरा तर ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील ५८ हजार ६२३ लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ९६५ लाभार्थ्यांचा पहिला आणि १९ हजार ९१७ लाभार्थ्यांचा दुसरा डोस झाला आहे. सर्वांची आकडेवारी काढली असता ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, ही समाधानाची बाब आहे.