शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

सर्वात वाईट वर्ष : ७२ वर्षांत लालपरीची चाकं ७७ दिवस थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 3:35 PM

दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही.

ठळक मुद्देदररोज कोटींचं उत्पन्न मिळविणा-या एसटीचे मीटर डाऊन

जगदीश कोष्टीसातारा : दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणारी सर्वसामान्यांची एसटी सोमवारी ७२ वर्षांची होत आहे. दरवर्षी १ जून हा एसटीचा स्थापन दिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो; पण एसटीच्या या वाटचालीत २०२० हे काळे वर्ष ठरले आहे. या प्रवासात प्रथमच तब्बल ७७ दिवस गाड्यांची चाकं जागेवर थांबली आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीनं प्रत्येक खेड्यापाड्यांना आपल्या नकाशावर आणले आहे. जावळीतील घनदाट खोरं, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील दºयाखोºयांतील गावांमध्ये एसटी पोहोचली आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी साता-यासह तालुक्यांच्या ठिकाणी येणाºया विद्यार्थ्यांसाठी एसटीच मोठा आधार होता.

सातारकरांचे पुणे, मुंबईशी जवळचे नाते आहे. घरटी एकजण तरी शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईत राहत आहे. सातारकरांची हीच गरज लक्षात घेऊन एसटीने पुणे, मुंबईला विनाथांबा गाड्या सुरू केल्या. त्यांना सातारकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर एसटीने या मार्गावर फेºया वाढवल्या आहेत. त्यातून एसटीला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत होता.

खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांशी स्पर्धा करत असताना एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही गाड्या दाखल झाल्या. त्यांचा दर, वारंवार होणारे अपघात यामुळे या गाड्या नेहमीच चर्चेत राहिल्या असल्या तरी आयटी क्षेत्रात, उच्च पदस्थ लोकांसाठी शिवशाहीचा प्रवास नेहमीच आपला वाटला आहे. यामुळे तोट्यातील एसटीला नवसंजीवनी मिळण्यास निश्चितच मदत होत होती.

दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट झाली आहे. हीच तूट भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने माल वाहतुकीसाठी मार्गही निवडला आहे. तो यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत; पण २०२० वर्ष मात्र कधीच ते विसरू शकणार नाहीत.कर्मचा-यांवर वेतनाची तलवारएसटीचं उत्पन्नचं थांबलं असल्याने कर्मचाºयांच्या डोक्यावर कायमच पगाराची टांगती तलवार आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर केवळ पगाराच्या विषयावरच चर्चा होत असते. 

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस