शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सातारा जिल्ह्यातील तीन कारखान्यांकडून ७७.४० कोटी एफआरपी थकीत

By दीपक शिंदे | Published: April 19, 2023 2:28 PM

कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत

सातारा : साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून यावर्षीही जिल्ह्यातील किसनवीर सह कारखाने शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यात पिछाडीवर आहेत. कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे नेमके किती दर मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.यावर्षीही ऊस उत्पादकांच्या उसाचे पैसे तीन साखर कारखान्यांनी ७७.४० कोटी थकीत आहेत. यावर्षी कारखान्यांचा पट्टा १५ मार्चपर्यंत पडला आहे. साखर कारखाने बंद झाले असले, तरी एफआरपी देण्यात तीन साखर कारखाने पिछाडीवर आहेत. यापैकी किसन वीर कारखान्याचेच ३४.७५ बाकी आहेत.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १५७.७६ कोटी असून १८२.६५ कोटी रक्कम अदा केली आहे. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने रक्कम ५०२८.४९ कोटी असून ५४.२४ कोटी रक्कम अदा केली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १०८.१० कोटी असून ७३३५.६८ अदा केले आहेत. या कारखान्याची अद्याप थकीत रक्कम ३४.७५ कोटी इतकी आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम २१६.५४ कोटी इतकी असून २७३.९३ कोटी अदा केले आहेत. स्वराज्य इंडिया ॲग्रो उपळवेची देय रक्कम ११२.८९ कोटी असून १२७.४४ कोटी अदा केले आहेत. खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंगची देय रक्कम १४०.१९ कोटी इतकी असून कारखान्याने १६७.६७ कोटी अदा केले आहेत.जरंडेश्वर शुगर ४१३.३३ कोटी इतकी रक्कम देय असून ५४५.५२ कोटी रक्कम अदा केले आहेत. खंडाळा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम ३१.९६ कोटी असून ३३.६० रक्कम अदा केली आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना देय २४९.८८ कोटी देय असून ३०३.४० अदा केले आहेत. अथनी शुगर शेवाळेवाडी कारखान्याची देय १०३.९८ असून १५ एप्रिलअखेर १३२.९७ कोटी रुपये अदा केले आहेत.कल्लापाण्णा आवाडे कारखान्याची (श्रीराम, फलटण) देय रक्कम १००.१० कोटी असून ११५.७४ काेटी अदा केले आहेत. जयवंत शुगर्स, धावरवाडी कारखान्याची देय रक्कम १४५.७३ कोटी असून आतापर्यंत १८६.८५ कोटी अदा केले आहेत. ग्रीन पावर शुगरची देय रक्कम १२३.३२ कोटी इतकी असून १०१.०६ काेटी अदा केले आहेत. शरयू ॲग्रो (कापशी) कारखान्याची १७८.१३ कोटी रक्कम देय असून १५७.७४ कोटी अदा केले आहेत.

किसन वीरच्या ऊस उत्पादकांना चिंताअथक परिश्रमांतून किसन वीर कारखाना सुरू करण्यात आला आहे. यावर्षी ४ हजार मे. टन गाळप क्षमता असून ४,६०,५४६ मे. टन ३१ मार्चअखेर गाळप केले आहे. मोठ्या संख्येने ऊस गाळप केला असला तरी ऊस उत्पादकांना वेळेवर बिले मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नियमानुसार गाळप सुरू करण्यापूर्वीच दर जाहीर करायला हवा होता; परंतु कारखान्यांनी नियमबाह्य कृती केली असून शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही. याबाबत साखर आयुक्त कारवाई करत नाहीत. -राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने