स्वप्नील शिंदे ।सातारा : जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी आल्या होत्या. २०१८ मध्ये या तक्रारींची संख्या दरमहा दोनशेवर पोहोचली आहे. मात्र, स्मार्टफोनच्या माध्यमातून त्रास देणारी बहुतांश मंडळी ओळखीतीलच किंवा नातेवाईकच असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.
आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सातारा जिल्ह्यात दररोज तब्बल ८-१० सायबर क्राईम होत असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाण डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे आहे. त्याची आकडेवारी जवळपास ७५ टक्क्यांच्या घरात आहेत. सायबर क्राईम विभागाकडे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत असे गुन्हे घडल्याचे तब्बल २४० अर्ज आले असून, त्यातील सर्वाधिक तक्रारी डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आहेत. ‘तुमच्या एटीएमकार्डची वैधता संपली असून, नवीन कार्डसाठी सीव्हीव्ही नंबर आणि त्यानंतर आलेला ओटीपी सेंड करा,’ असे फोन विविध प्रकारचे कार्ड वापरणाºयांना येतात.
फोनवर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्याने सीव्हीव्ही आणि ओटीपी सांगितला, की त्यांच्या खात्यातून काही रक्कम कमी झाल्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. तसेच व्हॉटसअॅपवर आलेले मॅसेस फॉरवर्ड करणे, या घटनामुळे अनेकांच्या धार्मिक व सांप्रदायिक भावना दुखावल्याच्या घडना घडल्या आहेत. मित्रमंडळी आणि नातेवाइकांसोबत काढलेल्या फोटो मॉर्फिंगच्या घटना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातही घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.फसवणुकीसाठी सातारा पोलिसांचा वेगळा ग्रुपसातारा पोलिसांच्या वतीने सायबर सेलने सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अंमलदारांचा स्टॉप एटीएम फ्रॉड हा व्हॉटसअॅप ग्रुप काढला आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार आल्यानंतर तक्रारदाराची प्राथमिक माहिती त्या ग्रुपवर टाकली जाते. जेवढ्या लवकर सायबर सेलला ही माहिती मिळते तेवढी जास्त रक्कम तक्रारदारास मिळत असते. त्यामुळे अनेकांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे.सोशल मीडियामुळे शहरासह ग्रामीण भागात गुन्हे सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून बदनामी, अश्लील फोटोटाकणे आणि कमेंट केल्याप्रकरणी शहरी भागासह अगदीग्रामीण भागातही शेकडो गुन्हे घडले आहेत. सायबरक्राईम हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादितनसून फेक अकाऊंट काढून बदनामी, हॅकिंग आणिडाटाचोरी असे गुन्हेही केले जात आहेत.
अनोळखी व्यक्तीचे मेसेज किंवा फेक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच लॉटरी लागल्याचे सांगणाºया कॉलला प्रतिसाद देऊ नका, तसेच सोशल माध्यमांवर व्हायरल होणारे सर्वच फोटो किंवा व्हिडीओ खरे असतील, असे नाही. त्यामुळे खात्री करूनच ते शेअर करा.- गजानन कदम,सहायक पोलीस निरीक्षक