वाठार स्टेशन : जिह्यात सध्या सुरू असलेल्या एकूण १४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गतिमान झाला असून, आजअखेर अर्ध्याहून अधिक गाळप या कारखान्यांनी पूर्ण केले आहे. राहिलेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत अजून किमान ७० ते ८० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्यांनी ठेवले असून, एप्रिल महिन्यापर्यंत गाळप पूर्ण करणार असल्याची माहिती साखर आयुक्तांना दिली.गतवर्षी जिल्ह्यातील एकूण १२ कारखान्यांनी आजपर्यंतच्या साखरनिर्मितीचा इतिहास पुसत जवळपास ६५ लाख टन उसाचे गाळप व ७५ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. मात्र चालू हंगामात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे व दुष्काळाजन्य परिस्थितीमुळे उसाची वाढ व्यवस्थित झाली नाही. परिणामी एकरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उसाचे क्षेत्र जरी मागील हंगामाएवढे दिसत असले तरी उत्पादन घटल्याने गेल्या वर्षाएवढे साखर उत्पादन होणार नाही, अशी परिस्थिती आहे. आजअखेर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ५१ लाख ५६ हजार ९०५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. तर जवळपास ४५ लाख ७ हजार टन उसाचे गाळप केले आहे. यात कारखानदारांनी व्यक्त केलेला ७० ते ८० लाख टनाचा अंदाज विचारात घेतला तर १०० ते ११० टन ऊस गाळप होईल ही बाब अशक्य असून, हंगामाच्या उरलेल्या अडीच महिन्यांत १४ कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू राहिले तरी जास्तीत जास्त ३४ ते ३५ लाख टन गाळप पूर्ण करू शकतील. यामुळे या हंगामात ६५ ते ७० लाख टन गाळप व ८० ते ८५ लाख क्विंटल साखरनिर्मिती होईल, अशीच परिस्थिती आहे.सातारा जिल्ह्यातील एकूण १४ कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ४६ हजार ५०० टन अशी आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात शरयु व स्वराज हे दोन नवीन कारखाने वाढल्याने या हंगामात प्रतिदिन गाळप क्षमतेत ८ हजार ५०० मे टनांची वाढ झाली आहे. त्यामुळे १८० दिवसांच्या गाळप हंगामात १५ लाख ३० हजार ऐवढे अधिक गाळप वाढणार आहे.चालू परिस्थितीतील कारखाने एप्रिल अखेर बंद होतील; परंतु पुढील गाळप हंगामात घटणारे क्षेत्र लक्षणीय आहे. त्यामुळे या हंगामात असणाऱ्या बहुतांशी कारखान्यांना आत्तापासूनच पुढील गाळप हंगामाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील हंगाम शेतकऱ्यांपेक्षा कारखान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (वार्ताहर) कारखानाआज अखेर एकूण उदिष्टकारखाना बंदगाळपसंभाव्य तारीखश्रीराम फलटण२३,८,०९०४ लाख १० हजार२२ एप्रिल कृ ष्णा, कऱ्हाड६८,०३६०११ लाख ५० हजार१५ एप्रिलकिसनवीर,भुर्इंज३७,८७००७ लाख२५ एप्रिल लोकनेते देसाई, पाटण१,५५,०१५२ लाख ५० हजार१० एप्रिल सह्याद्री, कऱ्हाड६,८४,०००१३ लाख ७२ हजार१५ मेअजिंक्यतारा, सातारा३,१५,४६०६ लाख३० एप्रिलरयत, कऱ्हाड२,५९,६४९४ लाख ५० हजार१५ एप्रिलप्रतापगड२,१०,४७८३ लाख ५० हजार२५ एप्रिलन्यू फलटण, साखरवाडी३,०९,८३५५ लाख१५ एप्रिल जरंडेश्वर, कोरेगाव२,५४,२२०४ लाख ५० हजार३० एप्रिलजयवंतशुगर, कऱ्हाड२,५३,२७०५ लाख१५ एप्रिलग्रीन पॉवर औंध३,१०,२६२५ लाख २५ हजार१५ एप्रिलशरयु, फलटण३,५४,३००६ लाख१० एप्रिलस्वराज, फलटण१,०३,३७०४ लाख१५ एप्रिलएकूण४५,०७,००९८२ लाख ५७ हजार
अडीच महिन्यांत ८० लाख टन
By admin | Published: February 12, 2016 9:39 PM