सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून, कोयना धरणात सध्या ९३.१२ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरूच आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे आवक होत असल्याने प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत; पण १५ आॅगस्टपर्यंत पाणीपातळी नियंत्रणात ठेवावी लागत असल्याने काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धोम, बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गेल्या चार दिवसांपासून विसर्ग सुरू आहे.|कोयनानगर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३८५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.७२ टीएमसी साठा झाला होता. तर कण्हेर ८.६८, बलकवडी ३.७०, तारळी धरणात ४.९७ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरणात ९८१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर तारळीत १२५२ क्युसेक आवक होत असून, विसर्गही तेवढाच सुरू आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०१ (४९२)कोयना २९ (३८५१)बलकवडी ११ (१९१६)कण्हेर ०१(५८३)तारळी ०९ (१६७९)
कोयना धरणात ९३ टीएमसी पाणीसाठा, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:55 PM
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून, कोयना धरणात सध्या ९३.१२ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरूच आहे.
ठळक मुद्देकोयना धरणात ९३ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच