शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोरेगाव शहरात ‘क्रेन’वाल्यांकडून नऊ महिन्यात नऊ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 10:55 PM

वाहतूक शाखा : बेशिस्त नागरिकांनी घेतला धसका; कारवाई सुरूच राहणार

साहिल शहा -- कोरेगाव शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रकाश धस व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या सम-विषम पार्किंग आणि क्रेन सर्व्हिसचा मोठा फायदा नऊ महिन्यांनी दिसू लागला आहे. ८ हजार ७३४ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून, त्या माध्यमातून ८ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. २५ फेब्रुवारी २०१४ मध्ये पोलीस निरीक्षकपदाची सुत्रे प्रकाश धस यांनी स्वीकारली. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्न सर्वोच्च प्राधान्य दिले. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह नगरविकास कृती समितीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. पोलीस दलाने स्थानिक स्वराज्य संस्थेकडे यासंदर्भात सहकार्याची विनंती केली होती. पोलीसमित्र मधुकर शेंबडे यांनीही सहकार्य केल्याने कोरेगावातील वाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला मूर्त स्वरुप आले होते. एप्रिल २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात अधिसूचना प्रसिध्द करुन हरकती मागविण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकांनी सूचविलेले बदल करुन प्रशासन-पोलीस-नागरिक असे एकत्र आले आणि मे २०१५ पासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर सम-विषम पार्किंग आणि क्रेन सर्व्हिस सुरु करण्यात आली. सुरुवातीला वाद-विवाद घडू लागले, मात्र कायदा व व्यवहार यांची सांगड घालून कारवाई सुरुच ठेवण्यात आली. आता तालुक्यातील वाहनधारकांना वाहतुकीची शिस्त लागल्याने कारवाईची संख्या घटत आहे. मे २०१५ या महिन्यात सर्वाधिक १७९१ वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला तर सर्वात कमी नोव्हेंबर २०१५ मध्ये ६७३ वाहनधारकांवर कारवाई झाली. वाहतूक शाखेचे हवालदार महादेव खुडे, पोलीसनाईक प्रवीण चव्हाण, गोरखनाथ साळुंखे, रामराव गायकवाड, दत्तात्रय तायशेटे, जयवंत शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.नो-पार्किंग केसेसमहिना केसेस दंड रक्कममे १७९१ १,७९,४०० रुपयेजून १३४५ १,३४,५०० रुपयेजुलै १०८९ १,0९,४०० रुपयेआॅगस्ट ८६१ ८६,३०० रुपयेसप्टेंबर ७४७ ७५,000 रुपयेआॅक्टोबर ७४० ७४,१०० रुपयेनोव्हेंबर ६७३ ६७,३०० रुपयेडिसेंबर ७९२ ७९,७०० रुपयेजानेवारी ६९६ ६९,६०० रुपयेवाहतूक व्यवस्था सुरळीत करणारच शहरातील वाहतूक व्यवस्था याविषयी ‘लोकमत’शी बोलताना पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी आम्ही कारवाई सुरुच ठेवणार असून, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहोत. येत्या काही दिवसांत शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. त्यानंतर वाहतूक आराखड्यातील तरतुदीनुसार बदल केले जातील. - प्रकाश धस, पोलीस निरीक्षक, कोरेगाव