शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

जिल्हा परिषदेत ९७२ नोकऱ्या; एका जागेसाठी ७७ जण परीक्षेस २१ संवर्ग

By नितीन काळेल | Published: September 01, 2023 6:05 PM

७४ हजार ५७८ उमेदवारांनी भरला अर्ज 

सातारा : मागील काही वर्षांपासून रखडलेली आणि जिल्हा परिषदेतील रिक्त तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी २१ संवर्ग असून ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. याचाच अर्थ सरासरी एका नोकरीसाठी ७७ जण परीक्षार्थी झाले आहेत.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदाच्या भरतीबाबत सूचना केली आहे. त्यानुसार राज्यात ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. सतारा जिल्हा परिषदेतीलही तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ३१ मार्च २०२४ ची संभाव्य रिक्त पदे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. एकूण २१ संवर्गाचा भरतीत समावेश आहे. शासनस्तरावरुन करण्यात आलेल्या सूचनेनुसार ही भरती योग्य पदातून १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी आणि २० टक्के अनुकंपा पदे वगळून ९७२ पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी होत आहे.इतर जिल्ह्यांसाठीही केला अर्ज... 

जिल्हा परिषद भरती राज्यात सुरु आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी अन्यही जिल्ह्यात अर्ज केला आहे. मात्र,एकाच पदासाठी एकापेक्षा अनेक जिल्हा परिषदेत अर्ज करू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले. कारण परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एका उमेदवाराला एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. तसेच परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने अडचण येणार आहे.

भरतीसाठी अर्ज आले असे... 

पद नाव          जागा      अर्ज संख्या 

आरोग्य पर्यवेक्षक     ०१        ११आरोग्य सेवक पुरुष ४० टक्के   ७६    २०८६५आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी  १७०   ९४४७आरोग्य सेवक महिला  ३५३    १९१८ औषध निर्माण अधिकारी    ३५    ४९९१ कंत्राटी ग्रामसेवक    १०१   १३५५०कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३३     २६२७कनिष्ठ अभियंता विद्युत     ०१     ३८४ कनिष्ठ आरेखक      ०२    १२ कनिष्ठ लेखा अधिकारी     ०४     १३३ कनिष्ठ सहाय्यक प्रशासन ६९     ९५४५ कनिष्ठ सहाय्यक लेखा   ०७     ११३३ पर्यवेक्षिका      ०३       ४०७  पशुधन पर्यवेक्षक    ४२    ९१६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४      १०७५ वरिष्ठ सहाय्यक प्रशासन  ०२      ६८३ वरिष्ठ सहाय्यक लेखा   १०     ६६३ विस्ताराधिकारी कृषी    ०१     १११विस्तार अधिकारी शिक्षण  ०२     १२५ विस्तार अधिकारी सांख्यिकी  ०५      १९६० स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  ५२     ३८२२ 

टॅग्स :jobनोकरी