सातारा: मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जीव वाचविताना पळतअसताना तीनशे फूट खोल कड्यावरून कोसळून बारा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास शेरेवाडी, ता. सातारा येथील शिरोबाच्या डोंगरावर घडली.सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेरेवाडी, ता. सातारा येथे असलेल्या आपल्या मामाकडे सोमेश्वर काही दिवसांपूर्वी आला होता. रविवारी सकाळी मामासोबत तोशिरोबाच्या डोंगरावर गेला होता. त्यावेळी मधमाशांचं पोळ अचानक उठले. या माशांनी मामा व सोमेश्वरवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्याच्या आकांताने मामा आणि भाचा इतरत्र पळू लागले. यावेळी डोंगराच्या कड्यावरून सोमेश्वरचा पाय घसरल्याने तो तब्बल तीनशे फूट कड्यावरून खाली कोसळला. हा प्रकार गावातील काही लोकांना समजल्यानंतर त्यांनी डोंगराकडे धाव घेतली. मात्र, कडा खोल असल्यामुळे त्यांना खाली उतरता आले नाही. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, देवेंद्र गुरव, आदित्य पवार, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह शेरेवाडीचे ग्रामस`थ घटनास`थळी दाखल झाले. यासर्वांनी दरीत उतरून सोमेश्वरचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, मधमाशांच्या हल्लामध्ये सोमेश्वरचा मामाहीगंभीर जखमी झाला असून, त्यालाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 6:38 PM