मुराद पटेल
शिरवळ: पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावरुन नीरा नदीपात्रात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील २४ वर्षीय युवतीने उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने, किकवी पोलीस व शिरवळ पोलीस व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित युवतीला नीरा नदीपात्रातून बाहेर काढत खांद्यावर घेत तत्काळ पुणे जिल्ह्यातील किकवी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या बाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,पुणे,निगडी येथील एका खाजगी कंपनीमध्ये नौकरीला असलेली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील 24 वर्षीय युवती बुधवार दि.28 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आली होती.दरम्यान,संबंधित युवतीबरोबर आणखी कोणी होते का ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
यावेळी संबंधित युवतीने अचानकपणे सारोळा पुलावर चढत नीरा नदीपाञात उडी मारल्याचे त्याठिकाणी उपस्थित असलेले युवक बंटी उर्फ सौरभ धाडवे-पाटील,शुभम दळवी,साईनाथ धाडवे-पाटील,हर्षद बोबडे,मनोज पांगारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण व शिरवळ रेस्क्यू टिमचे मुराद पटेल,साहिल काझी,सलमान काझी तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय सकपाळ,सचिन शेलार यांना दिली.
यावेळी किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालक तुळशिराम अहिरे यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेत युवकांनी धाडस दाखवित नीरा नदीमध्ये बुडणा-या संबंधित युवतीला नदीपाञातून बाहेर काढत बेशुद्ध झालेल्या युवतीला खांद्यावर घेत तत्काळ रुग्णवाहिकेतून किकवी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी शुध्द हरपलेल्या युवतीला शुध्दीवर आणण्यात यश मिळविले.यावेळी या घटनेची माहिती युवतीच्या कुंटूंबियांना देत किकवी पोलीसांनी संबंधित युवतीला कुंटूंबियांच्या स्वाधीन केले.दरम्यान,संबंधित 24 वर्षिय युवतीने सारोळा पुलावरुन नीरा नदीपाञात उडी मारुन आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला याचा उलगडा होऊ शकला नाही.
युवकांचे प्रसंगावधान...पोलिसांची तत्परता!
सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन २४ वर्षिय युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता नीरा नदीमध्ये बुडणा-या युवतीला प्रसंगावधान दाखवित बंटी उर्फ सौरभ धाडवे-पाटील,शुभम दळवी,साईनाथ धाडवे-पाटील,हर्षद बोबडे,मनोज पांगारे या युवकांनी तसेच तत्काळ किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण व शिरवळ रेस्क्यू टिमचे मुराद पटेल,साहिल काझी,सलमान काझी तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय सकपाळ,सचिन शेलार,रुग्णवाहिका चालक तुळशिराम अहिरे यांनी युध्दपातळीवर शर्थीचे प्रयत्न केल्याने युवतीचा जिव वाचविण्यात यश आले.