शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

सातारा: दहा फूट लांब, दीडशे किलो वजनाची मगर अखेर जेरबंद, दोन दिवसांपासून माजविली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 4:56 PM

वन्यप्राणी बचाव पथकाने पकडलेली मगर वन विभागाने ताब्यात घेतली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

कऱ्हाड : खोडशी, ता. कऱ्हाड येथे गत दोन दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या मगरीला जेरबंद करण्यात अखेर यश आले. प्राणीमित्र, तसेच वन विभागाच्या प्रयत्नानंतर गावालगतच्या ओढ्यातून ही मगर पकडण्यात आली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मादी असलेल्या या मगरीची लांबी दहा फूट, तर वजन १४५ किलो होते.खोडशी गावात दोन दिवस मगरीने भीतीदायक वातावरण निर्माण केले होते. गावातील मुख्य चौकात रविवारी, दि. २३ रात्री मगर आढळून आली. गावातील मुख्य चौकात कृष्णा डेअरीजवळील चौकात हणमंत भोपते, आबासाहेब भोपते, दत्तात्रय भोसले, स्वप्नील भोपते यांना मगर दिसली. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी पाहणी केली.

अखेर याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. मात्र, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचेपर्यंत मगर तेथून नजीकच्या ओढ्यात उतरली. त्यामुळे तिला पकडता आले नाही. त्यानंतर सलग दोन दिवस मगरीचे ग्रामस्थांना दर्शन होत होते. मात्र, तिला पकडण्यात यश येत नव्हते.कऱ्हाडातील वन्यप्राणी बचाव पथकाने अखेर त्यासाठी पुढाकार घेतला. या पथकातील सदस्य सोहेल शेख, रोहित कुलकर्णी, योगेश शिंगण, अजय महाडिक यांनी दोन तास प्रयत्न करून सुरक्षितरीत्या मगरीला पकडले. वनपाल सागर कुंभार, वनरक्षक अरविंद जाधव, योगेश बडेकर, अनिल कांबळे, शंभुराज माने, बाबा बंडलकर, दिपाली अवघडे यांनी त्याठिकाणी भेट दिली. वन्यप्राणी बचाव पथकाने पकडलेली मगर वन विभागाने ताब्यात घेतली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग