शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण, मशाल महोत्सवाचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 10:48 PM

Pratapgad : गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.

महाबळेश्वर किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे झाल्याने गुरुवारी रात्री ३६३ मशालींनी प्रतापगडाचा संपूर्ण परिसर उजळून काढण्यात आला. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.

किल्ले प्रतापगडवर ढोल-ताशांच्या गजर आणि फट्याक्यांची आतषबाजीत सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी चौथ्या माळेला हजेरी लावली. राजमाता कल्पनाराजे भोसले याही या महोत्सवाला उपस्थित होत्या. चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकाच्या गजरात व भगवे झेंडे फडकावित मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांना डोळ्यांत साठवून ठेवला.

सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त गडावर आले होते. गडावरील मंदिर परिसर व मुख्य द्वाराला चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सर्व आयोजन चंद्रकांत उतेकर, किल्लेदार विजय हवलदार, संतोष जाधव, आनंद उतेकर, संदीप राऊत, विलास जाधव प्रतापगड, तसेच वाडा कुंभरोशीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतापगडावर दोन घटांची होते प्रतिष्ठापनाप्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात दोन घट बसविले जातात. एक छत्रपती महाराजांच्या नावाने कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने. कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला. त्यांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी करून मनमोहक झुंबरे बसविल्यामुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Pratapgad Fortप्रतापगड किल्लाSatara areaसातारा परिसर