सातारा : राज्यामध्ये अनंत चतुर्दशी दिवशी देण्यात येणारी सुट्टी रद्द करण्यात आली असून त्या ऐवजी ईद-ए-मिलाद निमित्त २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अनंत चतुर्दशी दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यामध्ये यापूर्वी अनंत चतुर्दशी दिवशी ३८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही सुट्टी रद्द करून ती ईद-ए-मिलाद निमित्त २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येत असल्याचे अध्यादेश काढण्यात आले. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी अनंत चतुर्दशीला सुट्टी असते. त्याबरोबरच या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मिरवणुका आणि विसर्जन देखील होत असते. यानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अनंत चतुर्दशी निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.