कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात रविवारी सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ९.६ किमी अंतरावरील गोशटवाडी गावाच्या नैऋत्येला पाच किलोमीटर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली सात किमी अंतरावर होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.वसमत तालुक्यात जाणवला हादरावसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील पांगरा शिंदे व इतर गावांत रविवारी सकाळी ६:१० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले; परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने भूकंपाची नोंद झाली नसल्याचे सांगितले. कुरुंदा, वापटी, कुपटी, डोणवाडा, सुकळी, कुरुंदवाडी या गावांना भूकंपाचा धक्का जाणवला.
Satara: कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू धरणापासून किती अंतरावर.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:56 IST