निलेश साळुंखेकोयनानगर : कोयना परिसराला आज, शुक्रवार दुपारच्या सुमारास भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास भुकंपाने कोयना परिसर हादरला.कोयनानगर येथील भूकंपमापन केंद्रावर या सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. याची तीव्रता 3.00 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंपाच्या केंद्रबिंदुची खोली 9 किमी इतकी असुन भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस 7 किमी वर व कोयनानगरपासुन 12 किमी अंतरावर होता. भुकंपाचा धक्का कोयना परिसरात जाणवला.भुकंपाचा धक्का बसला असला तरी कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
Earthquake: कोयना परिसराला भूकंपाचा धक्का, 3.00 रिश्टर स्केल इतकी तीव्रता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 2:12 PM