शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 1:12 PM

‘बदलेंगे सोच, बेटी नही बोझ’ हा विचारही चहाबरोबरच मिळणार

सातारा : येथील लेक लाडकी अभियान, आयआयटी, मुंबई आणि एनर्जी स्वराज्य फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त सहयोगातून पहिला सोलर चहाचा प्रयोग साताऱ्यात करण्यात आला आहे. मुक्तांगणच्या वर्षा देशपांडे, ॲड. शैला जाधव, प्रा. संजीव बोंडे, एनर्जी स्वराज्यच्या भूमिका परिहर, सिद्धी रावराणे, शीतल महाजन यांच्या उपस्थितीत या सोलर चहाच्या गाड्याचे उद्घाटन करण्यात आले.‘इस ठेलेकी हर एक चाय, कार्बन डायऑक्साइड से बचाये’ असे घोषवाक्य घेऊन हा चहाचा गाडा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची संपूर्ण निर्मिती ही महिलांनी केली असून, हा गाडाही एक महिलाच चालविणार आहे. निसर्ग वाचवण्यासाठी पर्यावरणाची, झाडे लावण्याची केवळ चर्चा करणे पुरेशी होणार नाही तर कृतिशील होऊन जीवनात, व्यवसायात दृष्टिकोन उपयोगात आणणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्या दिशेने पडलेले सोलर चहाचा गाडा हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.याची सर्व तांत्रिकता सांभाळून जोडणी करण्याचे काम महिलांनी केले आहे. या सोलर चहाच्या गाड्यावर पहिल्यांदा चहा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर विविध खाद्यपदार्थही तयार करण्यात येणार असल्याचे सांगणात आले. या सोलर गाड्याचे यश पाहून इतर ठिकाणीही असाच गाडा तयार करण्यात येणार आहे.

यावेळी रूपाली मोहिते, सारिका पाखरे, माया पवार, स्वाती बल्लाळ, ऊर्मिला कांबळे, केतन मोहिते या सर्वांचे योगदान या उपक्रमाला असणार आहे.चहाबरोबरच मिळणार 'विचार'‘बदलेंगे सोच, बेटी नही बोझ’ हा विचारही चहाबरोबरच मिळणार आहे. महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गाच्या रक्षणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असून, एक नवा प्रयोग सर्वांसाठीच महत्त्वाचा ठरणार आहे. आयआयटी, मुंबई येथे यावर संशोधन करण्यात आले असून, पावसाळ्यातही अपेक्षित ऊर्जा या सोलर पॅनलमधून मिळणार आहे. थेट डीसी कनेक्टरच्या माध्यमातून हे जोडण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर