शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

सातारा: अर्धवट जळालेले अर्भक आढळले, फलटण तालुक्यात उडाली खळबळ

By दीपक शिंदे | Published: September 08, 2022 3:26 PM

शेताकडे निघालेल्या एका व्यक्तीस ही घटना निदर्शनास आली

कोळकी - फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथील लळेईची वगळीमध्ये पुरुष जातीचे अर्भक अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. शेताकडे निघालेल्या एका व्यक्तीस ही घटना निदर्शनास आली. याघटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोनवडी बुद्रुक गावामध्ये लळेईची वगळीस लागून असलेल्या मोकळ्या जागेत बाभळीचे तोडलेल्या काट्यात पुरुष जातीचे अर्भक जळालेल्या स्थितीत आढळले. अज्ञाताने काल राञीच्या सुमारास या अर्भकास जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राञीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे ते अर्भक अर्धवट जळाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.देवा मोरे हे आपल्या शेतात जात असताना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास त्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर मोरे यांनी गावचे पोलीस पाटील अनिल सुर्यवंशी यांनी माहिती दिली. सुर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन फलटण ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलिस अधिक्षक तानाजी बरडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, एपीआय अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर अर्धवट जळालेले अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस