शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
2
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
4
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
5
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
7
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
8
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
9
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
10
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
12
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
13
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
14
IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
16
"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न
17
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
18
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
19
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
20
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)

डोंगरावरील वसाहतींना ‘संरक्षक भिंती’चे कवच, सातारा पालिकेकडून शासनाला ३५ कोटींचा प्रस्ताव सादर

By सचिन काकडे | Published: December 19, 2023 7:22 PM

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे ...

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.किल्ले अजिंक्यताऱ्याच्या डोंगरउतावर अलिकडच्या आठ-दहा वर्षांत प्रचंड लोकवस्ती वाढली. केसरकर पेठ, माची पेठ तसेच बोगदा परिसरात हजारो  घरे व टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की येथील घरांना दरड कोसळण्याचा धोका संभवतो. आतापर्यंत अनेकदा किल्ल्यावरुन महाकाय दगड वसाहतींच्या दिशेने आले असून, घरांचे नुकसान झाले आहे.अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आठ वर्षांपूर्वी केसरकर पेठ ते बोगदा या दरम्यान संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे २० कोटींचा प्रस्ताव तयारही करण्यात आला. मात्र, ठोस काही झाले नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा डोंगरी भागाचा सर्व्हे करून संरक्षक भिंतीचा ३५ कोटींचा आरखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.अशी होणार कामे..

  • ज्या ठिकाणी दगड अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणीच संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी भिंतीला लागूनच नाला बांधला जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांना हे नाले जोडले जाणार आहेत.
  • सुमारे दोन किलोमीटर लांबीचा ही भींत असून, या भिंतीमुळे नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होणार आहे.
टॅग्स :Satara areaसातारा परिसर