सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे घडलेल्या प्रकारानंतर सातारा जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सर्व धर्मीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चामध्ये सर्व धर्मियांचे लोक सहभागी झाले सर्वांनी शांततेचे आवाहन केलं असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण न करता सर्वांनी सामोपचाराने राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलिसांनी देखील खबरदारीची भूमिका घेतली असून सातारा शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि प्रशासन सतर्क असून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलीस कुमक मागवून ती तैनात करण्यात आलेली आहे. अजूनही सातारा शहरातील इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यामुळे बँकिंग व्यवहार तसेच अनेक कार्यालयांचे व्यवहार ठप्प आहेत. शाळा महाविद्यालय सुरू असली तरी पालकांनी आपल्या जबाबदारी वर विद्यार्थ्यांना सोडावे आणि आणावे असे आवाहन शाळांच्या वतीने देखील करण्यात आले आहे.
साताऱ्यात सर्व धर्मीयांचा मुकमोर्चा, शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन; पोलिसांचा कडक बंदोबस्त
By दीपक शिंदे | Published: September 12, 2023 12:12 PM