शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

आईकडून सहा वर्षांच्या चिमुकल्यास चटके देऊन मारहाण, सातारा जिल्ह्यातील संतापजनक घटना

By जगदीश कोष्टी | Published: September 01, 2022 3:48 PM

संबंधित महिलेकडून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील भादे हद्दीमध्ये आईने सहा वर्षांच्या लहानग्याला चटके देत बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये संबंधित लहानग्याच्या हाताचे हाड मोडले आहे. त्याच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा भयानकता दर्शवित आहेत. संबंधित आईकडून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिरवळ येथील खासगी रुग्णालयाचे अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. सुदर्शन गोरे यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका ठिकाणी एक दाम्पत्य आपल्या कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, संबंधित कुटुंबीयातील अंदाजे ४५ वयाच्या महिलेने गावातीलच एका युवकाबरोबर संधान साधत पोटच्या सहा वर्षांच्या गोळ्याला क्रूरतेचा कळस गाठत अमानुषपणे मारहाण करीत चटके दिले. मारहाणीनंतर संबंधित महिलेने अपघात झाल्याची खोटी माहिती देत एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर प्रथमोपचार केले.यावेळी लहानग्याला बेदम मारहाण झाल्याने हाताचे हाड मोडल्याची शक्यता गृहीत धरून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लहानग्याला अस्थी रोग तज्ज्ञांकडे दाखविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित महिलेने लहानग्याला नेले. पतीला खोटी माहिती देऊन शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये सोमवार, २९ ऑगस्ट रोजी आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन गोरे यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत अपघाताचा बनाव संबंधित महिलेने केला.यावेळी डॉ. सुदर्शन गोरे यांनी संबंधितांना हाताचा क्ष-किरण चाचणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. क्ष-किरण चाचणीनंतर लहानग्याच्या हाताचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. ‘पुढील उपचार करणे गरजेचे आहे,’ असे सांगितले असता संबंधित महिलेने ‘पैसे नसल्याचे कारण देत परत दोन दिवसांनी येते,’ असे सांगितले. अपघातानंतर होणारी दुखापत व मारहाणीत होणारी दुखापत याचे निरीक्षण असणारे डॉ. सुदर्शन गोरे यांनी संबंधित महिला पुन्हा दोन दिवसांनंतर रुग्णालयामध्ये लहानग्याला घेऊन आली असता तत्काळ याबाबतची कल्पना शिरवळ पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला व लहानग्याला ताब्यात घेतले.यावेळी महिलेने शिरवळ पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी संबंधित महिलेचा पती व नातेवाइकांना याबाबतची कल्पना दिली असता ते तब्बल चार तासांनी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने शिरवळ पोलीसही हतबल झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस