सातारा: फलटणमध्ये रात्रीत बसवला महात्मा गांधींचा पुतळा, आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:12 PM2022-10-01T12:12:02+5:302022-10-01T12:17:31+5:30
गांधींचा हा पुतळा बसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती
विकास शिंदे
मलटण: दुरुस्तीच्या कारणास्तव तीन वर्षांपुर्वी फलटण येथील गजानन चौकातील काढण्यात आलेला महात्मा गांधी पुतळा रात्रीत बसवण्यात आला. रात्री गपचूप उशिरा हा पुतळा बसवल्याने तीन वर्षे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गांधींचा हा पुतळा बसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, वारंवार पालिका प्रशासनास विनंती व निवेदने देण्यात आली होती. दोन ऑक्टोबरपूर्वी हा पुतळा न बसवल्यास न्यायालयात जाण्याचा शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता.
सहा महिन्यांपूर्वी चौथाऱ्याचे काम सुरू झाले. शहर काँग्रेस युवक काँग्रेस यांनी वेळोवेळी आंदोलन केले. वास्तविक हा पुतळा सन्मानाने सर्वांच्या उपस्थित बसवता आला असता परंतू पालिका प्रशासनाने रात्री उशिरा हा पुतळा काही मोजक्या पालिका कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसवला आहे. रात्री गपचूप उशिरा हा पुतळा बसवल्याने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.