शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

पालखी मार्गांवर साक्षरतेचा जागर!, सातारा जिल्ह्यात लोणंद व फलटण येथे असाक्षरांची नोंदणी 

By प्रगती पाटील | Published: July 16, 2024 7:27 PM

घोषणा फलक ठरले लक्षवेधी

सातारा : साक्षरतेच्या नाविन्यपूर्ण घोषणा व गीतांचे गायन, माहिती पत्रकांचे वाटप, साक्षरता रथाद्वारे प्रचार, साक्षरता दिंडी अन् असाक्षरांची मुक्कामाच्या ठिकाणी नोंदणी अशा उपक्रमांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली.केंद्र पुरस्कृत ‘उल्लास’च्या प्रचारासाठी योजना शिक्षण संचालनालय आयोजित ‘वारी साक्षरते’ची या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रम सुरू आहेत. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर व उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत साक्षरतेचा जागर करण्यात आला. पंढरपूर येथून साक्षरता वारीतील कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणही करण्यात आले. फलटण येथे सकाळी मालोजीराजे शेती विद्यालयापासून जिंती नाका परिसरात मुख्य रस्त्यावर साक्षरता दिंडी काढण्यात आली. राज्य योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, विस्तार अधिकारी चन्नय्या मठपती, केंद्रप्रमुख दमयंती कुंभार, प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, योजना संचालनालयाचा साक्षरता रथही सहभागी झाले. जिंती नाका येथे पंचायत समितीने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे निंबाळकर, प्रशासनाधिकारी अरविंद निकम यांच्या मदतीने उभारलेल्या मंचावरून सादर केलेल्या नाविन्यपूर्ण घोषणा व गीते वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरली. शिवाजी भोसले शुभांगी बोबडे यांनी साक्षरता गीतांचे गायन केले. सागर जाधव उत्तम घोरपडे, मनोज कदम यांनी खुमासदार शैलीत वारकऱ्यांसाठी निवेदन केले. फलटण येथे साक्षरता रथाचे स्वागत फलटण एज्युकेशन सोसायटीचे तुषार निंबाळकर, विठ्ठल साळवे यांनी केले.

फलटण व खंडाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये बाल वारकऱ्यांची साक्षरता दिंडी निघाली. यामध्येही साक्षरतेचा घोषणा, साक्षरता गीते यांचा समावेश होता. विशेषत: पालखी मार्गावरील शाळांमधील उत्साह प्रशंसनीय होता. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या शाळा-शाळांमधून माहितीपत्रक (घडीपत्रिका)चे वाटप करण्यात आले. संभाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तर रमेश कवितके यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पथकांनी रथाद्वारे साक्षरतेचा जागर केला.

घोषणा फलक ठरले लक्षवेधीगेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका, वारीत भक्तीभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार, अक्षर अक्षर गिरवूया, साक्षर भारत घडवूया, साक्षरतेकडून समृद्धीकडे, जन जन साक्षर अशा घोषणा देत हातात फलक घेऊन दिंडीकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. केंद्र शासनाने दखल घेतलेल्या बारामतीच्या सुशीला व रुचिता या आजी-नातीचे, चिंचणी-सातारच्या बबई मस्कर यांची छायाचित्रे, रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण हिची कलाकृती, उल्लास कार्यक्रमाची माहिती व वैशिष्ट्ये साक्षरता रथावर दर्शवण्यात आली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022