सातारा : मुद्दल आणि व्याजासह ४ लाख देऊनही आणखी व्याजापोटी ५ लाखांची मागणी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एका खासगी सावकाराविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत सुमन लक्ष्मण रिटे (रा. ढवळ, ता. फलटण) या महिलेने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर गावातीलच तानाजी नाना शिंदेच्या विरोधात सावकारीचा गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने २०१४ मध्ये २ लाख रुपये खासगी कर्ज घेतले होते. त्यानंतर महिलेने मुद्दल २ आणि व्याज २ असे एकूण ४ लाख रुपये २०१६ मध्ये दिले होते. तरीही संबंधित व्याजापोटी आणखी ५ लाख मागत होता. तसेच पैसे न दिल्यामुळे तक्रारदार महिलेच्या सासऱ्याच्या नावे असलेली शेतजमीन संबंधिताने स्वत:च्या नावे करुन घेतली, अशी तक्रार दिली होती.या तक्रारीनंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तानाजी शिंदेविरोधात सावकारीचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
जिल्ह्यात खासगी सावकारीचे पेव, फलटण तालुक्यात आणखी एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 4:21 PM