शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
5
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
6
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
7
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
8
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
9
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
10
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
11
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
12
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
13
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
14
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
15
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
16
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार
17
"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
18
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
19
३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत
20
Mithun Chakraborty: 'बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!'; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...

अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरांचे काम पूर्णत्वास

By नितीन काळेल | Updated: March 27, 2025 19:28 IST

जिल्ह्यात ३७ हजार निवाऱ्यांसाठी मंजुरी 

सातारा : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वेगाने कामे सुरू असून आतापर्यंत ३७ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील २८ हजार लाभाऱ्श्यांना पहिला हप्ताही मिळाला आहे. विशेष म्हणजे सुरुपखानवाडीत अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुलांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यास मंजूर उद्दिष्टांनुसार पात्र लाभार्थ्यांना जलद गतीने घरकुले मंजूर केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३७,३८७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर २८ हजार ७२४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. आतापर्यंत २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत.

जिल्ह्यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे माण तालुक्यातील सुरुपखानवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील संगीता उत्तम कदम यांनी केवळ ३५ दिवसांत घरकुल बांधून पूर्ण केले आहे. हा जिल्ह्यातील एक विक्रम ठरला आहे. कारण, यापूर्वी २०२६-१७ मध्ये माण तालुक्यातीलच गोंदवले खुर्द येथील शालन बबन निंबाळकर यांनी ६१ दिवसांत घरकुल बांधण्याचा उच्चांक प्रस्थापित केला होता.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवासमधील घरकुल बांधणी जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत २७४ घरकुले बांधून पूर्ण झालेली आहेत. लाभार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयाने हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाzpजिल्हा परिषदHomeसुंदर गृहनियोजन