शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

सातारा जिल्ह्यात बेचाळीस हजार जनावरांना ‘आधार’ टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:30 PM

योगेश घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधार हा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरवा मानला जातो. ‘आधार’च्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येते. त्याचप्रमाणे आता दुभत्या जनावरांपर्यंतही ‘आधार’द्वारे पोहोचता येणार आहे. राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४२ हजार दुभत्या जनावरांचे आधार टॅग करण्यात आले असून, तब्बल दोन लाख जनवारांना टॅगींग ...

योगेश घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधार हा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरवा मानला जातो. ‘आधार’च्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येते. त्याचप्रमाणे आता दुभत्या जनावरांपर्यंतही ‘आधार’द्वारे पोहोचता येणार आहे. राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४२ हजार दुभत्या जनावरांचे आधार टॅग करण्यात आले असून, तब्बल दोन लाख जनवारांना टॅगींग केले जाणार आहे.दुभत्या जनावरांच्या कानांना टॅगींग लावल्यानंतर या जनावरांचे वय, उंची, आहार याची माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअरमध्ये आॅनलाईन भरण्यात येणार आहे. तसेच जनावरांच्या मालकाचे नाव, गाव, जनावरांची जात, किती दूध देते, लसीकरण कधी झाले? याची माहिती असणारआहे.विशेषत: दुधाळ जनावरांना ‘फायबर’चा टॅग (बिल्ला) लावला जाणार आहे. यातून शासनाला जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जनावरांचे टॅगींग झाल्यानंतर संबंधित गावातील जनावरांच्या सर्व माहितीची मास्टर फाईल तयार करण्यास सोपे होणार आहे. तसेच आजारी-निरोगी जनावरांपासून तयार होणाऱ्या पशुजन्य पदार्थाचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही. नवीन प्रणालीनुसार या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात २०१२ च्या पशुगणेनुसार २ लाख ६३ हजार सहाशे चार दुभत्या जनावरांची संख्या आहे. राष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यात ४२ हजार दुभत्या जनावरांना आधार टॅगींग करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांकडून नोंदणी केली जाणार आहे.गेल्या सहा महिन्यांपासून दुभत्या जनावरांना आधार टॅगींग करण्याचे काम सुरू आहे.जिल्ह्यात सर्वात जास्त कºहाड तालुक्यामध्ये आधार टॅगींग करण्यात आले आहे. याठिकाणी ५३ हजार २१८ दुभत्या जनावरांची संख्या असून, यात ९ हजार २५४ जनावरांना टॅगींग करण्यात आले आहे. तसेच फलटण तालुक्यात ३४ हजार ५७५ दुभत्या जनावरांची संख्या असून, यामध्ये ८ हजार ४०१ जनावरांना टॅगींग केले आहे.आधारचे फायदेदुभत्या जनावरांच्या आधार नोंदणीमुळे ब्रिडिंग, न्यूट्रीशन, आरोग्याची सर्व माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर लसीकरण, जनावरांची विक्री व संख्या तसेच या विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची ओळख सहज पटणार आहे.वर्षभर चालणार कामराष्ट्रीय पशू उत्पादकता अभियानांतर्गत जिल्ह्यात आधार टॅगींगचे काम सुरू झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आतापर्यंत ४२ हजार जनावरांना टॅगींग करून झाले आहे. तसेच टॅगचे काम वर्षभर चालणार आहे.तालुके दुभती जनावरं,टॅग केलेली जनावरेसातारा २४७९२ ५६८४वाई १६२९८ ४३८३कोरेगाव २५९६० २२६३जावळी ९३४५ ११५२फलटण ३४५७५ ८४०१कºहाड ५३२१८ ९२४५खंडाळा १२४१२ १२७५खटाव २६७६२ ३४१९माण २७६३८ १७०२पाटण २८९८५ ४११०महाबळेश्वर ३६१९ २९२०