सातारा : सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
सातारा येथील यशवंत हॉस्पिटलजवळ असणाऱ्या वरदविनायक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती आंचल दलाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे छापा टाकण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री त्यांच्या टीमने येथे छापा टाकला असता दिलीप नामदेव इरळे (रा. बसप्पापेठ, राधिकारोड, सातारा) हा जुगारअड्डा चालवत होता. त्याला याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता तो नसल्याचे सांगितले. यावेळी तेथे पन्नासहून अधिकजण तीन पानी जुगार खेळत होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऐवज होता. रोकड आणि दुचाकी, मोबाइल असा सुमारे दहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत वाचक पोलीस उपनिरीक्षक भीमराव यादव, पोलीस हवालदार मुल्ला, पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक प्रवीण पोळ, शंकर गायकवाड, तेजस भोसले, उज्ज्वल कदम, प्रसाद शिंदे, राजकुमार घोरपडे, अविराज वारागडे, सुशांत गवळी आदी सहभागी झाले होते.
चाैकट : सर्वाधिक कोरेगावातील लोक...
प्रभाकर व्यंकटराव बर्गे (वय ५७, कोरेगाव), संदीप चंद्रकांत देवकुळे (३५, रा. मंगळवार पेठ, सातारा), सतीश रमेश अवघडे (३१, रा. मंगळवार पेठ, सातारा), सुरेश बाळकृष्ण रोमन (४२, रा. जुना मोटार स्टॅण्ड, कोरेगाव), दीपक लक्ष्मण फाळके (४१, रा. सातारारोड, कोरेगाव), राजेंद्र अशोक तपासे (३९, रा. वर्ये, ता. सातारा), अस्लम मेहबूब शेख (३७, रा. सदरबझार सातारा), सतीश चंदर गाढवे (४८, रा. आंब्रे, पो. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे), आसिफ शफी सय्यद (५0, रा. सातारारोड, ता. कोरेगाव), परवेज जब्बार शेख (४0, रा. गुरुवार परज, सातारा), रामरतन रामदेव सिंग (४९, रा. स्वारगेट, पंचशील चौक, पुणे), दत्तात्रय अरुण कदम (३४, रा. बुरुडगल्ली, कोरेगाव), आनंद तानाजी बर्गे (४१, रा. आझाद चौक, कोरेगाव), संतोष बबन किर्दत (४५, रा. करंजे पेठ, सातारा), गोरख श्रीधर आवळे (२६, रा. मालगाव, ता. सातारा), नीलेश काशीनाथ देशमुख (३२, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव), अब्दुल अजीज मोहमद हनीफ शेख (५१, रा. शनिवार पेठ, सातारा), संपद चंदर बालगुंडे (४९, रा. मूर्ती, ता. बारामती, जि. पुणे), संपत चंदर बालगुुंडे (रा. मूर्ती, ता. बारामती, जि. पुणे), संदीप तानाजी पवार (रा. फाळके चौक, सातारारोड, ता. कोरेगाव), विलास तिलोकचंद ओसवाल (पेंडसेनगर, मोळाचा ओढा, सातारा), सूरजकुमार भोलाकुमार (रा. यशवंत हॉस्पिटलजवळ, करंजे, शाहूपुरी, सातारा), अकबर इकबाल शेख (रा. दत्तनगर, कोरेगाव), सुनील विश्वास आवळे (रा. मालगाव, ता. सातारा), सरफराज गणी नदाफ (रा. शांतीनगर, कोरेगाव), चंद्रकांत यशवंत कुचेकर (रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे), नितीन गोपाळ फाळके (रा. सुतारवाडा, पाडळी, सातारा), सचिन रजपूत (दौलतनगर, सातारा), मनोज शांताराम शिंदे ( गुरुवार पेठ, सातारा), संतोष बंडू धुमाळ (रा. जोशीवाडा, गोडोली, सातारा), संदीप विश्मकर्मा (करंजे तर्फ सातारा, शाहूपुरी, सातारा), धनंजय विठ्ठल कुंभार (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), रोहित मानसिंग घाडगे (रा. गोडसेवाडी, ता. कोरेगाव), सुरेश हल्लाप्पा कुलकुटगी (रा. सत्वशीलनगर, सातारा), संग्राम किसनराव जाधव (रा. जिहे, ता. सातारा), धनंजय संपतराव जाधव (रा. प्रथमेश रेसिडन्सी, शनिवार पेठ, सातारा), गणेश बाळू पवार (रा. गंगासागर कॉलनी, मोळाचा ओढा, सातारा), श्रेयस धनंजय कदम (रा. प्रथमेश रेडिडेन्सी, शनिवार पेठ, सातारा), अर्जुन राम दूधभाते (रा. करंजे तर्फ सातारा), अनिल सुरेश घाडगे (सातारारोड, ता. कोरेगाव), राजू इक्बाल शेख (रा. दत्तनगर, कोरेगाव), सदाशिव महादेव देशमुख (रा. बोरगाव, ता. सातारा), सुनील वामन भिसे (मतकर कॉलनी, सातारा), रूपचंद तुकाराम साबळे (रा. शिवथर, ता. सातारा), मोहन बाबासोा शिंदे (रा. आझादचौक, कोरेगाव), दिगंबर गुराप्पा सेलुक (रा. करंजे तर्फ सातारा), खलील शमशुद्दीन मोमीन (रा. किन्हई, ता. कोरेगाव) यांचा समावेश आहे.