महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीच्या भिंती, संरक्षक भिंती या आकर्षकपणे रंगवून बाराखडी, एबीसीडी अक्षरे, पक्षी, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, संसारोपयोगी वस्तू, खेळणी, झाडांची माहिती अशी विविध माहिती विद्यार्थ्यांना शाळेचा तास सुटल्यानंतर, मधल्या सुटीत, पोषण आहार, परिपाठ, खेळ खेळताना, शाळेला सुटी असताना विद्यार्थी भिंतीकडे पाहत शाळेतील अभ्यासाबरोबर बाहेरील ज्ञान भेटत होते. गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईन परीक्षा दिल्या आहेत.
यावर्षीही तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचे धोरण ठरविले आहे. शाळेतील बोलक्या भिंती अबोल झालेचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे
फोटो
२९आदर्की
आदर्की परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा ओस झाल्या असल्याने शाळेतील भिंती अबोल झाल्या आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)