सातारा : सातारा तालुका पोलिसांनी डीपी चोरीतील फरार संशयित कोंडिबा लक्ष्मण माने (रा. चिखली, ता. सातारा) याला अटक करून त्याच्याकडून जिल्ह्यातील उंब्रज, पाटण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. माने याने चाळकेवाडी परिसरातील डीपी चोरीचा गुन्हा करून तो गेले दोन वर्षे फरार होता.
पोलिसांना सापडू नये यासाठी तो वेळोवेळी त्याचा राहण्याचा पत्ता बदलत होता, तरीही सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याची गोपनीय माहिती काढून तो ठोसेघर परिसरात आल्याची माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, नितीराज थोरात, सतीश पवार, सागर निकम, महादेव घाडगे यांनी ही कारवाई केली.