कºहाड : ‘काँगे्रस पक्षात गेली ३० ते ४० वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षासाठी योगदान दिले, पक्षानेही मला संधी दिली. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत काम करीत असताना पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे,’ असे मत काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.दरम्यान, शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चर्चा करून पुढील राजकीय दिशा ठरविणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केलेकाँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी पाटील बोलत होते.आमदार पाटील म्हणाले, ‘मी युवक काँगे्रसपासून पक्षात काम करतोय. दिवंगत प्रेमिलाताई चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माझ्या विरोधात कान भरण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. त्यातूनच मला बऱ्याच कार्यक्रमांपासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. या बाबी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न पटणाºया आहेत. त्यामुळेच माझ्यावर प्रेम करणाºया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलण्याचा निर्णय मी घेतला असून, त्यांची मते जाणून घेऊन मी पुढील राजकीय दिशा ठरविणार आहे.’पक्षांतर्गत होणाºया कूरघोड्या, खच्चीकरण या बाबी सहा महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानावर घातल्या आहेत. त्यावेळी त्यांनी बघू, असे सांगितले. मात्र, पुढे काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. म्हणून आता कार्यकर्त्यांसमोर माझे मत मांडणार आहे.त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाºया कार्यकर्त्यांचा शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी मेळावा आयोजित केला असून, कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरविणार आहे
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चर्चा करून पुढील राजकीय दिशा ठरविणार : आनंदराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:04 AM