शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गैरवर्तन केल्यास शिवशाहीचा चालक हद्दपार! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:38 PM

सातारा : खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या असून, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिवशाहीच्या चालकांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा निर्णय एसटीने घेतला आहे. दरम्यान, बोरिवलीहून साताºयाला येणाºया शिवशाहीच्या संबंधित मद्यपी चालकाला काळ्या यादीत टाकले आहे.राज्यातील प्रत्येक गावात गेल्या सहा ...

ठळक मुद्देबोरीवली-सातारा एसटीचा ‘तो’ मद्यपी चालक काळ्या यादीत

सातारा : खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या असून, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिवशाहीच्या चालकांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा निर्णय एसटीने घेतला आहे. दरम्यान, बोरिवलीहून साताºयाला येणाºया शिवशाहीच्या संबंधित मद्यपी चालकाला काळ्या यादीत टाकले आहे.

राज्यातील प्रत्येक गावात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ एसटीनं सेवा केली आहे. दि. १ जून रोजी एसटीचा ७० वा स्थापना दिन आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत एसटीने अनेक बदल स्वीकारले. तर खासगीकरणाला तोंड देत असताना दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आणण्यासाठी सकारात्मक बदल करणे क्रमप्राप्त होते. परिवर्तनाच्या या मालिकेतीलच अलीकडील सर्वात मोठा टप्पा म्हणजे खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या भाडेतत्वावर चालवायला घेणे. या गाड्या आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या असल्याने त्यावरील चालक खासगी कंपनीचाच आहे. तर केवळ वाहक हा परिवहन महामंडळाचा असतो.

एसटीचा प्रवासी खºया अर्थाने खेडोपाड्यातील सर्वसामान्य माणूस आहे. त्याचा खाकी गणवेशातील चालकावर विश्वास आहे. तर अलीकडे खासगी चालक आले आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?, कारण अलीकडे चुकीच्या घटना घडत आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्यात शिवशाही गाड्यांच्या अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. बोरीवली-सातारा या शिवशाही गाडीतील चालक मद्यपान केलेल्या स्थितीत आढळला होता. त्या ठिकाणी पर्यायी चालक दिला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येणे क्रमप्राप्त होते. एसटीने नेहमीप्रमाणे संबंधित चालकाविरोधात अहवाल तयार केला गेला. तो मिळाल्यानंतर सातारा विभागाने संबंधिताला कामावरून कमी केले.

चालक देणाºया संबंधित कंपनीलाही ही माहिती देण्यात आली. तसेच इतर अन्य सार्वजनिक प्रवासी करणाºया कंपनीलाही ही माहिती दिली. त्यामुळे त्या चालकाला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले, अशी माहितीही विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली आहे.एसटी चालकांनाही प्रशिक्षण...सातारा विभागाच्या ताफ्यात ११ शिवशाही गाड्या असून, त्यातील सहा या एसटीच्या मालकीच्या तर पाच भाडेतत्वावरील आहेत. एसटीच्या स्वत:च्या शिवशाहीला त्यांचाच चालक आहे. तसेच विभागातून एकाला मास्टर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तो प्रत्येक आगारात जाऊन अन्य चालकांना शिवशाही गाड्या चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे भविष्यात शिवशाही गाड्यांचे प्रमाण वाढले तरी एसटीचेच चालक पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको. कारण, भविष्याची ही पेरणी आहे. 

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनाही शिवशाही गाड्यांमधून सवलती देऊ केल्या आहेत. सातारा-बोरिवली ही सेवा पूर्णपणे शिवशाहीवर चालवणे व सातारा-मुंबई मार्गावर अधिकाधिक शिवशाही गाड्या चालविण्याचा संकल्प केला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे.- सागर पळसुले, विभाग नियंत्रक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ