अभिनव पवारवेळे : पुणे-बंगळुरू महामार्गावर आज, सोमवारी सकाळच्या सुमारास रेडीमिक्स मिक्सर व ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रक खंबाटकी घाटातील उताराच्या बाजूस असलेल्या वळणावर महामार्गावरच पलटी झाल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळ्याहून साताऱ्याच्या बाजूला उताराच्या दिशेने ही दोन्ही वाहने चालली होती. त्यावेळी मालट्रक (टी.एन. ५२, एबी ४१२७) ला पाठीमागून येणाऱ्या रेडीमिक्स मिक्सर ट्रकने (एम.एच. ११, सीएच ८७२६) ने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने महामार्गावरच पलटी झाली. यामध्ये मालट्रकमधील असलेला माल रस्त्यावरच विखुरला गेला. तसेच रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली.या अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह टीम तत्काळ दाखल होऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला. या अपघाताच्या ठिकाणी पोलिसांना वेळे ग्रामस्थांनीही मदत केली. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Satara News: खंबाटकी घाटात अपघात, ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; चालक जखमी
By प्रशांत कोळी | Published: January 23, 2023 1:50 PM